भारत आमचा देश आणि यशवंत इंस्टिट्यूट आमची कर्मभूमी आहे.
पालक आमचे दैवत आहेत.
सारे विद्यार्थी आमच्यासाठी केंद्रस्थानी आहेत.
आम्ही विद्यार्थी तसेच पालकांप्रती कर्तव्यनिष्ठ आहोत.
विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि क्षमतेचा आम्हाला अभिमान आहे.
त्यांची बुद्धिमत्ता आणि क्षमता अधिकाधिक प्रगल्भ व्हावी याची आम्ही जबाबदारी घेवू आणि
त्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू.
आम्ही, यशवंत इंस्टिट्यूटचे शिक्षक विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि त्यांच्या सर्वांगीण
प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत.
विद्यार्थ्यांचे कल्याण आणि पालकांचे समाधान यातच आमचे सौख्य सामावले आहे.